वन महोत्सव सप्ताहात आमदार बडोले यांच्या हस्ते सडक अर्जुनीत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम

सडक अर्जुनी (गोंदिया) – वन विभाग गोंदिया व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक अर्जुनी यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सव सप्ताह निमित्त तालुका क्रीडा संकुल, सडक अर्जुनी येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, पोलीस निरीक्षक गणेश वनारे, वनपरिक्षेत्र अधिकारी एम.डी. तरोने, क्षेत्र सहायक एस.के. पटले, तसेच अनिल मुनेश्वर, अरविंद मेंढे, भागवत लंजे, इतर अधिकारी, वन विभागाचे कर्मचारी आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नव्या पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा निर्धार उपस्थितांनी केला.