लाखांदूर-दहेगाव मार्गावर धावत्या दुचाकीवर पडसाचे झाड कोसळले; आई व मुलगी गंभीर जखमी

wartaa.in
Share on

लाखांदूर – लाखांदूर वरून दहेगाव मार्गे काही खासगी कामासाठी मालके गावाकडे दुचाकीने जात असताना एक गंभीर अपघाताची घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या दाम्पत्यासोबत त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या पडसाच्या झाडाची मोठी फांदी कोसळली. यामध्ये महिला आणि लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या.

ही घटना घडली तेव्हा ते तिघेही दुचाकीने चाललेले असताना अचानकपणे झाडाची जड फांदी त्यांच्या गाडीवर कोसळली. यात दिपक प्रकाश शेंडे वय २५ वर्ष यांची पत्नी आणि त्यांची मुलगी अंशिका दीपक शेंडे वय ३ वर्ष हे दोघीही जखमी झाल्या आहेत. संबंधित कुटुंब भागडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

सुदैवाने रस्त्यावरून जाणाऱ्या काही प्रवाशांच्या ही घटना लक्षात आली. त्यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत गाडीवर कोसळलेली झाडाची फांदी बाजूला सारली आणि जखमी महिलेला व मुलीला रुग्णवाहिकेच्या मदतीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या दोघींची प्रकृती स्थिर असून आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अपघातात पती दिपक शेंडे यांना किरकोळ खरचटणे झाले असून त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार देण्यात आले.

ही घटना दुपारच्या सुमारास घडली असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांचे वेळेवर छाटणी न केल्याने ही दुर्घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

घटनास्थळाच्या आसपासच्या नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांची लवकरात लवकर तपासणी करून फांद्या छाटाव्यात जेणेकरून अशा प्रकारच्या दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत.

ही घटना जरी मोठी जीवितहानी टळलेली असली तरी एका निष्पाप लहान मुलीला व तिच्या आईला आपले प्राण गमवावे लागले असते, यामुळे या दुर्घटनेने अनेकांना अस्वस्थ केले आहे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आणि सार्वजनिक सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *