राजकुमार बडोले फाउंडेशनच्या दुसऱ्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

wartaa.in
Share on

अर्जुनी मोरगाव (प्रतिनिधी) :
राजकुमार बडोले फाउंडेशनची दुसरी बैठक ताडगाव रोड येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीस मोठ्या संख्येने मान्यवर, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बैठकीचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी होते.

या वेळी राकेश भास्कर यांनी मार्गदर्शन करताना फाउंडेशनचे सर्वेसर्वा, माजी मंत्री व विद्यमान आमदार राजकुमार बडोले यांच्या आगामी रणनीतीची सविस्तर माहिती दिली. बडोले साहेब समाजासाठी राबवू इच्छित असलेल्या विविध उपक्रमांची यादी बैठकीत वाचून दाखवण्यात आली. शैक्षणिक मदत, ग्रामीण भागातील आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम, रोजगारनिर्मिती उपक्रम आणि सामाजिक जनजागृती मोहीमा यांचा त्यात समावेश होता.

राकेश भास्कर यांनी स्पष्ट केले की, “राजकुमार बडोले साहेबांनी समाजासाठी मोठी स्वप्ने उभी केली आहेत. पण ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी समाजबांधवांचा सक्रीय पाठिंबा अत्यंत गरजेचा आहे.”

बैठकीस उपस्थित कार्यकर्त्यांनी या उपक्रमांबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केली आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.

तसेच बैठकीला राजकुमार बडोले फाउंडेशनचे प्रशांत शहारे आणि मिथुन टेम्भुर्णे यांनीही संबोधित केले. त्यांनी उपस्थितांना फाउंडेशनच्या कार्यात सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले.

बैठकीस उपस्थित मान्यवर

बैठकीला अजय शहारे, लालदास इस्तारी डोंगरवार,  संदेश लाडे,  आस्तिक बनसोड, नरेंद्र मेश्राम, रतन फुलुके, विकेश लाडे, यशवंत शहारे, आकाश ठवरे, नितेश शहारे, शैलेश टेंभुर्णे, कांतीलाल डोंगरवार, आनंदराव भैसारे, विनोद शहारे, जनार्दन मेश्राम, राजेंद्र जांभुळकर, रमेश लाडे, मोरेश्वर कांबळे, राजेंद्र लाडे, मोरेश्वर गोंडाने, देवदास मेश्राम, त्रिशरण शहारे, दयाल राऊत, युवराज डोंगरे, तुकाराम शेंडे, संदीप लाडे, संतोष मेश्राम आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या सर्वांच्या उपस्थितीमुळे बैठक यशस्वी आणि फलदायी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *