पिंडकेपार येथे समता सैनिक दलाचे उदघाटन

wartaa.in
Share on


पिंडकेपार (ता. साकोली) :
पिंडकेपार येथे समता सैनिक दलाचे उदघाटन हा ऐतिहासिक क्षण आज दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी करूणा बौद्ध विहार येथे घडला. या प्रसंगी समाजात एकता, शिस्त, आणि जागृतीचा नवा अध्याय सुरू झाल्याचे सर्वांच्या मुखातून उमटले.

समता सैनिक दल शाखेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रचारक शाखा, इमामवाडा अशोका बौद्ध विहार नागपूर येथील मान्यवर — मार्शल सुरेंद्र भेलावे सर, मार्शल रोशन पाटील सर, मार्शल सौरभ बारमाटे सर आणि मार्शल धम्ममाला टेटू मॅडम — यांनी उपस्थित राहून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला एक वेगळेच तेज प्राप्त झाले.

मार्शल धम्ममाला टेटू मॅडम यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समता सैनिक दलाच्या सैनिकांनी एकोप्याची भावना आणि मैत्री टिकवून ठेवत समाजहितासाठी सदैव जागृत राहावे. समाजात समता, बंधुता आणि नैतिक शिस्त रुजवण्याची जबाबदारी प्रत्येक सैनिकाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या शाखेच्या निर्मितीमागे गावातील बौद्ध उपासिकांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या अथक परिश्रम आणि सामाजिक निष्ठेने समता सैनिक दलाची शाखा करूणा बौद्ध विहारात साकार झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. स्नेहा नंदेश्वर यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. प्रियंका वालदे यांनी केले. समता सैनिक दलाच्या या उपक्रमाने महिलांची सामाजिक सहभागाची जाणीव अधिक दृढ झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता सैनिक दलाच्या महिला सैनिकांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये श्रीमती विभा खोब्रागडे, सौ. गोमती खोब्रागडे, श्रीमती मनोरमा खोब्रागडे, सौ. गौतमा खोब्रागडे, सौ. हेमलता नंदेश्वर, सौ. ज्योत्स्ना नंदेश्वर, सौ. संध्या नंदेश्वर, सौ. येशुकाबाई नंदेश्वर, सौ. स्नेहा नंदेश्वर, सौ. प्रियंका वालदे, सौ. दिक्षा वालदे, सौ. मंगला नंदेश्वर, सौ. अनिता नंदेश्वर, श्रीमती सुशिला नंदेश्वर, सौ. मधुमाला राऊत, सौ. कारणबाई शहारे, श्रीमती प्रिया साखरे, श्रीमती वनिता वालदे, सौ. रुपलता टेंभुरणे, सौ. अश्विनी टेंभुरणे या सर्व सैनिकांनी एकदिलाने सहकार्य करून कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.

या उद्घाटन सोहळ्याने गावात सामाजिक बांधिलकी, बौद्ध मूल्यांची जागृती आणि स्त्रीशक्तीचे सामर्थ्य यांचे सुंदर दर्शन घडवले. समता सैनिक दलाचे उदघाटन हे फक्त एक संघटनात्मक कार्य नाही, तर समाजपरिवर्तनाचा प्रारंभ आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

समता सैनिक दलाच्या या शाखेमुळे गावातील युवक आणि महिला यांना शिस्त, सेवाभाव, व सामाजिक समरसतेच्या कार्यात सहभागी होण्याची नवी दिशा मिळेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *