भाषण कला प्रशिक्षण शिबीराचे यशस्वी आयोजन

wartaa.in
Share on

भीलगाव ,
स्थानिक संघपुत्त बोधीविहार भीलगाव (जि. नागपूर) येथे भाषण कला प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी वंदनीय भन्ते शीलानंद होते. प्रमुख अतिथी मा. निर्मलाताई वाघधरे होत्या. भाषण कला प्रशिक्षण शिबीराचे प्रमुख मार्गदर्शक व प्रशिक्षक म्हणून प्रा. डॉ. शंकर बागडे उपस्थित होते.
यावेळी संपन्न झालेल्या भाषण कला प्रशिक्षणात डॉ. शंकर बागडे यांनी भाषण कलेसाठी आवश्यक घटक आणि भाषणाच्या स्टेप सविस्तरपणे प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले. तसेच भाषण कलेविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले.भाषण कसे करायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवल्यानंतर भाषण कला प्रशिक्षण शिबीरात शिबीरार्थी विद्यार्थी आणि स्त्री पुरुषांना भाषणाच्या स्टेपनुसार भाषण करण्याची संधी देण्यात आली. यावेळी प्रयाण हुमणे, आरोही गाडेकर, आरूष गाडेकर, विहान हुमणे, निष्का वालदे, सम्यक भालाधरे या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाषण केले. तसेच आशा वासनिक, पूजा बागडे, कांता गजभिये, अंजली गायकवाड, वंदना उके, चित्रा कराडे, सुषमा भालाधरे, रेखा भालेराव, कल्पना मुलमुले, वैजयंती वाळके, ममता बोरकर, रजनीताई, गजभिये ताई, रत्नाकर तिरपुडे,प्रभाकर वाळके यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे भाषण केले. तसेच प्रमुख अतिथी निर्मलाताई वाघधरे यांनी समयोचित भाषण केले.
या भाषण कला प्रशिक्षण शिबीराचे सूत्रसंचालन संघपुत्त बोधीविहार समितीचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोरेश्वर वासनिक यांनी केले. याप्रसंगी भीलगाव येथील स्त्री पुरुषांची आणि मुला मुलींची बहुसंख्येनी उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी संघपुत्त बोधीविहार समिती भीलगावच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *