अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून अर्जुनी मोरगावच्या महागांवात उलगडली ग्रामीण प्रतिभेची नवी ओळख!

wartaa.in
Share on

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागांव येथे अटल जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. ग्रामीण भागातील युवा कलावंत आणि खेळाडूंमधील सुप्त गुणांना राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा महोत्सव एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला आहे असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे, महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमाताई ढेंगे, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई देशमुख, पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार, पंचायत समिती उपसभापती संदीपजी कापगते, जिल्हा परिषद सदस्य कविताताई कापगते,पंचायत समिती सदस्य घनश्यामजी धामट, पंचायत समिती माजी सभापती सविताताई कोडापे, पंचायत समिती माजी उपसभापती होमराजजी पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य प्रमोदजी लांडगे, पंचायत समिती सदस्य नुतनलालजी सोनवाने, भाग्यश्रीताई सयाम, पं. स. सदस्या कुंदाताई लोगडे, पं. स. सदस्या पुष्पलताताई दृगकर, रामदास कोहाडकर निमंत्रित सदस्य, जल व्यवस्थापन समिती, गटशिक्षणाधिकारी सुभाष बागडे पं. स. अर्जुनी-मोरगाव, विस्तार अधिकारी बी. डब्ल्यू. भानारकर , सरपंच प्रभाकरजी कोवे, उपसरपंच सुरेशजी पुस्तोडे, आर. के. देशमुखजी, विनोदजी डोंगरवार, तंटामुक्ती अध्यक्ष शिवरामजी बोरकर, हंशराजजी गोटेफोडे, भागवतजी झोडे, माहूरकुडा येथील सरपंच लक्ष्मीकांतजी नाकाडे , नाजूकजी लसुंते आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *