अर्जुनी/मोरगाव येथे ६ नोव्हेंबरपासून तालुकास्तरीय श्रामणेर शिबिर दहा दिवसांचे धम्मप्रशिक्षण;
वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.
अर्जुनी/मोरगाव येथे ६ नोव्हेंबरपासून तालुकास्तरीय श्रामणेर शिबिर
दहा दिवसांचे धम्मप्रशिक्षण; श्रामणेर जीवनपद्धती, चिवराचे महत्त्व, शील-सदाचार आणि बौद्ध संस्कारांवर विशेष भर
अर्जुनी/मोरगाव : भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका अर्जुनी/मोर यांच्या वतीने वर्ष तिसऱ्या तालुकास्तरीय श्रामणेर शिबिराचे आयोजन विश्वशांती बुद्ध विहार, समता कॉलनी, अर्जुनी/मोर येथे दि. ६ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. या शिबिरात १५ ते ४० वर्षे वयोगटातील इच्छुकांना सहभागी होता येणार असून, धम्मप्रशिक्षणाच्या माध्यमातून शिस्तबद्ध, संयमी आणि सदाचारयुक्त जीवनाची दिशा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या शिबिरामध्ये मुंबई येथील भदन्त डॉ. बी. सुमेध बोधीजी आणि राहुल हेलोडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे. श्रामणेर शिबिर हे केवळ धार्मिक प्रशिक्षण नसून, आत्मसंयम, शिस्त, त्याग, करुणा, मैत्री आणि समतेच्या मूल्यांची प्रत्यक्ष जीवनात जोपासना करण्याची एक महत्त्वपूर्ण संधी आहे. श्रामणेर जीवनपद्धतीत साधेपणा, विनय, शीलपालन आणि मनाच्या शुद्धीला विशेष महत्त्व दिले जाते.
चिवराचे महत्त्व आणि श्रामणेर जीवनाची शिस्त
बौद्ध परंपरेत चिवराला विशेष महत्त्व आहे. चिवर हे केवळ वस्त्र नसून त्याग, साधेपणा, संयम आणि धम्ममार्गाप्रती समर्पणाचे प्रतीक मानले जाते. चिवर धारण करण्याबरोबरच त्यामागील नैतिक जबाबदारी, विनयशील आचरण आणि शिस्त यांचे पालन करणे महत्त्वाचे असते. श्रामणेर प्रशिक्षणातून शीलाचे पालन, मनावर नियंत्रण, योग्य आचरण, ज्येष्ठांचा आदर, सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार आणि समाजाप्रती कर्तव्यभावना यांचे संस्कार रुजविण्यावर भर दिला जाणार आहे.
शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्ती, नैतिक मूल्ये, सामाजिक समता आणि बंधुभाव यांविषयी जागृती निर्माण होण्यास मदत होणार आहे. धम्मप्रशिक्षणातून मिळणारी शिस्त आणि जीवनमूल्ये दैनंदिन जीवनात अंगीकारून समाजात शांतता, सलोखा आणि सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
मान्यवरांचे सहकार्य व आयोजकांचे आवाहन
भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका अर्जुनी/मोरचे तालुकाध्यक्ष आर. के. जांभुळकर यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्जुनी/मोरच्या नगराध्यक्षा मंजुषा बारसागडे, नगरसेवक यशकुमार शहारे, नगरसेवक दानेश साखरे, डॉ. भारत लांडे, डॉ. कृणाल मेश्राम, डॉ. कल्पना सांगोळे, नाना शहारे, दिनेश खोख्रागडे, जगझापे सर, आनंदकुमार जांभुळकर सर, प्रशांत लांडे, जितेंद्र साखरे आणि दिवाकर शहारे यांचे सहकार्य लाभत आहे.
शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी सोमदास गणवीर (९४२०८६५५५०), नरेंद्र खोब्रागडे (९४२१८९६८६५), रमेश लाडे (९०४९३१८५८८), मोरेश्वर धारगावे (९१५८०९६६१३) आणि यशवंत गणवीर (९४२३६०६३४४)
आर.के.जाभुळकर (7588770643)
श्रीकांत लोणारे (93706 94651)
संजीव लोणारे (917972524381)
त्रिशरण शहारे (839-066-2361)
यांच्याशी संपर्क साधावा.
संबोधी बौद्ध विहारातील समता कॉलनी, अर्जुनी/मोर येथील उपासक-उपासिका तसेच संपूर्ण तालुक्यातील बौद्ध बांधवांनी या श्रामणेर शिबिरात सहभागी होऊन धम्मप्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका अर्जुनी/मोर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

