नाना पटोले यांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, सात वर्षीय चिमुकली गंभीर जखमी
स्थान: Lakhani
भंडारा : काँग्रेस नेते नाना पटोले आणि डॉ. प्रशांत पडोळे यांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर सात वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. ही घटना भंडारा-साकोली राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी तालुक्यातील गडेगाव येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले आणि डॉ. प्रशांत पटोले यांच्या ताफ्यातील वाहनाची दुचाकीला धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याचा मृत्यू झाला, तर अपघातात सात वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कारवाई सुरू केली. या प्रकरणी ताफ्यातील संबंधित वाहनाच्या चालकाला लाखनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या अपघातप्रकरणी लाखनी पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

