रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड; आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अभिनंदन!
वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया
रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षपदी निवड; आमदार राजकुमार बडोले यांच्याकडून अभिनंदन!
मा. सौ. रजनीताई गिऱ्हेपुंजे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी, गोंदिया या पदावर निवड झाल्याबद्दल आमदार तथा माजी मंत्री ईजि.राजकुमार बडोले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशीवार यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रजनीताई गिऱ्हेपुंजे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
महिला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडताना महिलांचे संघटन मजबूत करणे, महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे आणि पक्षाची विचारधारा समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविणे, यासाठी त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
रजनीताई गिऱ्हेपुंजे यांच्या निवडीमुळे महिला संघटनेला नवी ऊर्जा मिळेल आणि पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

