महिलांनी समाजक्रांतीच्या विचारातून व्यवसायाकडे वळावे; बाबासाहेबांचे विचार अंगीकारावेत – कुणालजी मेश्राम सम्यक बौद्ध समिती खामखुरा यांच्या विद्यमाने ‘बा-भिमा, तुझ्या जन्मामुळे…’ प्रबोधनात्मक भीमगीतांच

महिलांनी समाजक्रांतीच्या विचारातून व्यवसायाकडे वळावे; बाबासाहेबांचे विचार अंगीकारावेत – कुणालजी मेश्राम सम्यक बौद्ध समिती खामखुरा यांच्या विद्यमाने ‘बा-भिमा, तुझ्या जन्मामुळे…’ प्रबोधनात्मक भीमगीतांच
Share on

वार्ताहर : अजय शहारे | विदर्भ

महिलांनी समाजक्रांतीच्या विचारातून व्यवसायाकडे वळावे; बाबासाहेबांचे विचार अंगीकारावेत – कुणालजी मेश्राम

सम्यक बौद्ध समिती खामखुरा यांच्या विद्यमाने ‘बा-भिमा, तुझ्या जन्मामुळे…’ प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

खामखुरा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक परिवर्तन आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी सम्यक बौद्ध समिती खामखुरा यांच्या विद्यमाने ‘बा-भिमा, तुझ्या जन्मामुळे…’ या प्रबोधनात्मक भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून सामाजिक समता, बंधुता, शिक्षण आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना कुणालजी मेश्राम यांनी महिलांनी केवळ सामाजिक क्रांतीच्या विचारांपुरते मर्यादित न राहता त्या विचारांच्या प्रेरणेतून व्यवसायाकडे वळावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्या जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन केले. महिलांनी शिक्षण, संघटन आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून स्वतःची प्रगती साधून कुटुंबासह समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असेही त्यांनी प्रतिपादन केले.

‘बा-भिमा, तुझ्या जन्मामुळे…’ या भीमगीतांच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनकार्याचा, सामाजिक न्यायाच्या लढ्याचा आणि समतेच्या विचारांचा जागर करण्यात आला. भीमगीतांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला, तसेच आंबेडकरी विचारधारेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आयु. सौ. पौर्णिमा ढेंगे, सभापती महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद गोंदिया; आयु. सौ. भागेश्री सयाम, पंचायत समिती सदस्य अर्जुनी/मोरगाव; आयु. नूतन सोनवाने, पंचायत समिती सदस्य अर्जुनी/मोरगाव; आयु. नंदकिशोर चापले, आयु. संतोष आकरे, आयु. जयप्रकाश लाडे, आयु. संजीव लोणारे, आयु. प्रमोद डोंगरे, आयु. संजय नंदेश्वर आणि आयु. कमलेश राऊत यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाला खामखुरा येथील नागरिकांसह बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रबोधनात्मक भीमगीतांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, महिला सक्षमीकरण आणि बाबासाहेबांच्या विचारांचा जागर घडवून आणणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *