अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २६ किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा! *आमदार राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नांना यश;

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २६ किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा! *आमदार राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नांना यश;
Share on

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २६ किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा!

*आमदार राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नांना यश; राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, ग्रामीण रस्ते विकासाला मिळणार नवी दिशा*

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. शासनाच्या ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या निर्णयानुसार तालुक्यातील एकूण २६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. आमदार राजकुमार बडोले यांच्या विशेष प्रयत्नांमुळे या मागणीला यश मिळाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा या निर्णयात समावेश करण्यात आला आहे. मोरगाव, निलज, मालकनपूर, माहुरकुडा, सिरोली, महागाव, बोरी आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यासोबतच गावागावांतील परस्पर संपर्क सुधारण्यास मदत होणार आहे.

या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळावा, यासाठी परिसरातील नागरिकांनी आमदार राजकुमार बडोले यांच्याकडे वेळोवेळी मागणी व निवेदने सादर केली होती. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन आमदार बडोले यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष प्रयत्नांना यश मिळत शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा मिळाल्यामुळे संबंधित रस्त्यांच्या विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने निधी व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र, नवीन कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित रस्त्यांची आवश्यक माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपलब्ध करून देणे, तसेच रस्त्यांच्या विकासासंदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर राहणार आहे.

ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

शासनाच्या या निर्णयामुळे अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणाच्या सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होणार आहे. जनतेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळवून देण्यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी केलेल्या प्रयत्नांचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *