सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ शाळा-महाविद्यालयांना भेटी आमदार राजकुमार बडोले यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा शिक्षक व प्राध्यापकांशी संवाद;

सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ शाळा-महाविद्यालयांना भेटी आमदार राजकुमार बडोले यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा शिक्षक व प्राध्यापकांशी संवाद;
Share on

वार्ताहर : अजय शहारे | सडक/अर्जुनी

सुधाकर कोहळे यांच्या प्रचारार्थ शाळा-महाविद्यालयांना भेटी

आमदार राजकुमार बडोले यांच्यासह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा शिक्षक व प्राध्यापकांशी संवाद;

पदवीधर मतदारांना सहकार्याचे आवाहन

सडक अर्जुनी : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार मा. सुधाकरजी कोहळे यांच्या प्रचारार्थ सडक अर्जुनी तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन शिक्षक आणि प्राध्यापकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करून महायुतीच्या उमेदवाराला पाठबळ देण्याचे आवाहन करण्यात आले.
या प्रचार दौऱ्यादरम्यान सडक अर्जुनी येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, सचिन हायस्कूल तथा कनिष्ठ म्हविद्यालय पाटेकुर्रा, आदिवासी विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात खजरी, आदिवासी शिव विद्यालय डव्वा,या सह तालुक्यातील शैक्षणिक संस्थांना भेटी देण्यात आल्या. यावेळी शिक्षक, प्राध्यापक आणि पदवीधर मतदारांशी संवाद साधत निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. महायुतीचे उमेदवार सुधाकरजी कोहळे यांच्या प्रचाराला बळ देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार बडोले यांचेसह उपस्थित मान्यवरांनी केले.

बॉक्स
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सक्रिय

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वतीने प्रचाराला गती देण्यात येत असून, विविध क्षेत्रांतील पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून शाळा व महाविद्यालयांतील शिक्षक आणि प्राध्यापकांशी संवाद साधून निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

या वेळी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले, भाजपच्या जिल्हाध्यक्ष सीताताई रहांगडाले, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा महिला अध्यक्ष रजनीताई गिऱ्हेपुंजे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भूमेश्वर पटले, जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी, गजेंद्र फुंडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष छायाताई चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, डी. यू. रहांगडाले, सडक अर्जुनी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, भाजप सडक अर्जुनी मंडळ अध्यक्ष राजेश कठाणे, भाजप सौंदड मंडळ अध्यक्ष विलास बागडकर, शिवसेना तालुकाध्यक्ष विलास कापगते, भाजप महिला तालुकाध्यक्ष शितलताई गौर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव प्रशांत बालसनवार, नगरसेवक देवचंद तरोने, ज्योतीताई जांभुळकर, लक्ष्मीकांत तागडे, राहुल गेडाम यांच्यासह विविध विद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *