राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसीलदार व, आमदार बडोले यांना निवेदन.
वार्ताहर : अजय शहारे | सडक/अर्जुनी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तहसीलदार व,
आमदार बडोले यांना निवेदन
सडक अर्जुनी
तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या धान पिकाला मावा तुडतुडा या रोगाने ग्रस्त केले आहे. अशा परिस्थितीत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या धान पिकाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा. याशिवाय दरवर्षीप्रमाणे तालुक्यात उत्तम पाऊस पडल्यामुळे धनाची पीक परिस्थिती लक्षात घेता शासकीय धान खरेदी केंद्रावर दरवर्षीप्रमाणे हेक्टरी 40 क्विंटल धान खरेदी करण्यात यावा. प्रमुख मागण्यांना घेऊन सडक अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सडक अर्जुनी चे नायब तहसीलदार जांभुळकर तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांना आज 16 ऑक्टोबर रोजी निवेदन सादर करण्यात आले.
निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार,तालुका महिला अध्यक्ष रजनीताई गिऱ्हेपुंजे, नगरपंचायत अध्यक्ष तेजराम मडावी, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, तालुका युवक अध्यक्ष दिनेश कोरे, नगरसेवक देवचंद तरोने, नगरसेवक आनंदकुमार अग्रवाल,हेमराज खोटेले,शहर अध्यक्ष आकाश गुप्ता, भोलानाथ कापगते, आस्तिक परशुरामकर, विवेक बाळबुद्धे, भोजराज परशुरामकर, विजय मेश्राम, रवी भलावी ज्ञानेश्वर कापगते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

