आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

wartaa.in
Share on

एलआयसी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्कीम 2025

एलआयसी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्कीम 2025 ही आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी आहे. शिक्षण हा मुलभूत हक्क आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. अशा वेळी एलआयसीची ही शिष्यवृत्ती योजना त्यांच्या भवितव्याला नवे पंख देणार आहे. हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यामध्ये या शिष्यवृत्तीचा मोलाचा वाटा ठरेल यात शंका नाही.

एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशनने पुन्हा एकदा देशभरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी एलआयसी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्कीम 2025 अंतर्गत शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वप्न पूर्ण होणार आहे.

2022-23, 2023-24 किंवा 2024-25 या शैक्षणिक वर्षांमध्ये दहावी/बारावी/डिप्लोमा किंवा तत्सम परीक्षा किमान 60% गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या शिष्यवृत्ती साठी पात्र ठरतील. विशेष म्हणजे, 2025-26 या शैक्षणिक वर्षात पहिल्या वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. एलआयसीने ही योजना विशेषतः गरीब व आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी राबवली आहे.

शिष्यवृत्तीचे प्रकार

एलआयसी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्कीम 2025 मध्ये दोन प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातील:

1) सामान्य शिष्यवृत्ती

ही शिष्यवृत्ती मुलगा आणि मुलगी दोघांनाही उपलब्ध आहे.

मेडिसिन, अभियांत्रिकी, तसेच इतर कोणत्याही क्षेत्रातील पदवीपूर्व किंवा एकात्मिक अभ्यासक्रमासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाईल.

शासन मान्यताप्राप्त व्यावसायिक शिक्षण संस्था, आयटीआय किंवा तत्सम औद्योगिक शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल.


2) विशेष शिष्यवृत्ती

ही शिष्यवृत्ती फक्त मुलींसाठी आहे.

बारावीनंतर (10+2 पद्धती) उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना विशेष शिष्यवृत्ती दिली जाईल.

याशिवाय, पदवीच्या कोणत्याही क्षेत्रात दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या मुलींनाही या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.


अर्ज प्रक्रिया

पात्र विद्यार्थी आपला अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करू शकतात. यासाठी एलआयसीची अधिकृत वेबसाईट https://licindia.in यावर अर्ज करावा लागेल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती योग्य प्रकारे भरावी लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळ न घालवता त्वरित अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *