Uncategorized

सडक अर्जुनी नगरपंचायतीत स्वर्गरथ व सेप्टिक टँक सक्शन वाहनाचे लोकार्पण

Share on

सडक अर्जुनी नगरपंचायत येथे नुकताच स्वर्गरथ आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा नवीन “शोषण टँकर” (“सेप्टिक टँक सक्शन वाहन”) या वाहनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती.

या उद्घाटन प्रसंगी नगरपंचायत अध्यक्ष तेजरामजी मडावी, उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, पंचायत समिती सभापती चेतनजी वडगाये, नगरपंचायत सभापती शाहिस्ताताई शेख, कमलादेवी अग्रवाल, सायमाताई शेख, नगरपंचायत मुख्याधिकारी सारंगजी खांडेकर, नगरसेवक देवचंदजी तरोने, महेंद्रजी वंजारी, अंकितजी भेंडारकर, असलेशजी अंबादे, गोपीचंदजी खेडकर, विशालजी शहारे, राजकुमारजी हेडाऊ उपस्थित होते.

तसेच नगरसेविका शशिकलाताई टेम्भूरने, दीक्षाताई भगत, रजनीजी परिहार, रेणूजी अग्रवाल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाशजी काशिवार हे देखील याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय नगरपंचायतचे कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाच्या निमित्ताने अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या नव्या वाहनांमुळे आणि स्वर्गरथाच्या उपलब्धतेमुळे नागरिकांची सोय होणार असून शहरातील स्वच्छता व अंतिम संस्काराशी संबंधित सुविधा अधिक बळकट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *