सडक अर्जुनी तालुका क्रीडा संकुलातील त्रुटी दूर करा; आ. राजकुमार बडोले यांच्या प्रशासनाला सूचना
Sadak Arjuni: सडक अर्जुनी येथील तालुका क्रीडा संकुलाची पाहणी करण्यात आली असून, संकुलामध्ये आढळलेल्या त्रुटींची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी. तसेच आवश्यक त्या उपाययोजना राबवून या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात, अशा स्पष्ट सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. क्रीडा संकुलातील आवश्यक सुधारणा व सुविधा प्रभावीपणे राबवून याद्वारे खेळाडूंना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान पंचायत समितीचे सभापती चेतनजी वडगाये, शिशिरजी येडे आणि तालुका क्रीडा अधिकारी उपस्थित होते. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री सा. न्याय व विशेष सहाय्य राजकुमार बडोले यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

