Uncategorized

राजेश माणिकराव ढोके यांना ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर

wartaa.in
Share on

नागपूर येथील राजेश माणिकराव ढोके यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ढोके यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

हा राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता आयएमआरटी कॉलेज सभागृह, गंगापूर रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. अतिविशिष्ट मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात संपन्न होणार आहे.

राजेश माणिकराव ढोके यांना राष्ट्रीय स्तरावरील हा सन्मान जाहीर झाल्याने शिक्षण, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *