जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरगाव येथे ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जागतिक हात धुवा दिन’ उत्साहात साजरा ..
वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरगाव येथे 'वाचन प्रेरणा दिन' आणि 'जागतिक हात धुवा दिन' उत्साहात साजरी*
———————
वाचन हे व्यक्ततीमत्व विकासाचे प्रभावी साधन-सु. मो.भैसारे ऊच्चश्रेणी मुख्याध्यापक, मोरगाव
अर्जुनी/मोर:-
नजीकच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' आणि आरोग्याचा संदेश देणारा 'जागतिक हात धुवा दिन' अत्यंत उत्साहात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. या प्रसंगी शाळेत विशेष वाचन साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके, बालसाहित्य व प्रेरणादायी चरित्रांचे वाचन केले. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगताना म्हटले की,"वाचाल तर, वाचाल, शिकाल तर टिकाल नाहीतर भंगारात फेकाल" असा संदेश दिला .पुस्तके हीच आपली खरी मित्र असून ,वाचनामुळे कल्पनाशक्ती वाढते आणि व्यक्तिमत्त्व विकास होतो," असे विचार मांडले.
तसेच, आरोग्य व स्वच्छताविषयक जनजागृतीसाठी 'जागतिक हात धुवा दिन' निमित्त विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले. हात धुण्याचे योग्य वैज्ञानिक पद्धतीचे प्रात्यक्षिक (स्टेप्स) करून दाखवण्यात आले. जेवणापूर्वी आणि शौचास्तानंतर साबणाने हात धुणे आरोग्यासाठी किती गरजेचे आहे, यावर पुरुषोत्तम गहाणे यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही 'मी स्वच्छ, माझा परिसर स्वच्छ' अशी शपथ घेत नियमितपणे हात धुण्याची प्रतिज्ञा केली.
या दुहेरी उपक्रमामुळे शाळेत आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील जे.एन. ठवकर, रेवनांद उईके, वामन घरतकर, अचला कापगते, रुपाली मेश्राम, कल्पना राऊत, अक्षय मरसकोल्हे आदी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

