महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी भंडाऱ्यात भव्य जाहीर सभा!
महात्मा बुद्धांचा पवित्र बोधगया स्थित “महाबोधी महाविहार” हा चार महिन्यांपासून आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे. “महाविहार मुक्तीसाठी” सुरू असलेला देशव्यापी संघर्ष आता भंडारा जिल्ह्यात देखील प्रचंड वेगाने पोहोचला आहे. या अनुषंगाने “महाबोधी महाविहार बोधगया मुक्ती आंदोलन” अंतर्गत १५ जून २०२५ रोजी दुपारी ४ वाजता भंडारा शहरातील दशहरा मैदानात एक भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. डॉ. आकाश लामा सर आणि भंते डॉ. चंद्रकीर्ती सहभागी होणार आहेत. तसेच अन्य मान्यवर मार्गदर्शकांमध्ये आयु. चंद्रशेखर पाटील, भंते धर्मतप, मा. भीमाराव अंबेडकर, मा. प्रकाश दर्शिनिक आणि मा. सुनील साऱ्या यांचा समावेश आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून बी.टी. अॅक्ट १९४९ रद्द करून महाबोधी महाविहार बौद्ध अनुयायांच्या ताब्यात द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. भारतीय बौद्ध महासभा, ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, बौद्ध महिला प्रतिताभ, महिला सशक्तीकरण संघ, तसेच विविध सामाजिक संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या ऐतिहासिक लढ्यात हजारो अनुयायांच्या उपस्थितीची अपेक्षा असून, आंदोलनाची गती वाढविण्यासाठी ही सभा निर्णायक ठरणार आहे.

