गडचिरोली-कांकेर सीमेवर जंगलात नक्षल डंप जप्त; शस्त्रास्त्रांचा साठा जप्त
जिल्हा पोलीस दल, बीएसएफ आणि बीडीएस पथकाची संयुक्त कामगिरी; सीमाभागात शोधमोहीम तीव्र
कांकेर :
महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमाभागात सुरक्षा दलांनी मोठी कामगिरी करत नक्षलवाद्यांचा एक डंप शोधून काढला आहे. गडचिरोली आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील दागुनटोला-पुसगट्टा दरम्यानच्या डोंगराळ जंगलातून शस्त्रास्त्रांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले.
दुर्गम डोंगराळ भागात संयुक्त कारवाई
बांदे-छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दागुनटोला आणि पुसगट्टा गावांच्या परिसरातील घनदाट जंगलात नक्षलवाद्यांनी साठा लपवल्याची माहिती समोर आली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस दल, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि बीडीएस पथकाने संयुक्त शोधमोहीम राबवून हा साठा जप्त केला.
सीमाभागात शोधमोहीम आणखी तीव्र
या कारवाईत शस्त्रास्त्रांसह अन्य महत्त्वपूर्ण साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. नक्षल डंप जप्त केल्यानंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवरील भागात जवानांकडून अतिरिक्त सतर्कता बाळगत व्यापक कोम्बिंग व सर्चिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे.

