भारतीय बौद्ध महासभा शाखा अर्जुनी/मोर.च्या वतीने श्रामणेर शिबिर नियोजन बैठक संपन्न.
वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.
भारतीय बौद्ध महासभा शाखा अर्जुनी/मोर.च्या वतीने श्रामणेर शिबिर नियोजन बैठक संपन्न
अर्जुनी/मोरगाव : भारतीय बौद्ध महासभा शाखा अर्जुनी/मोरगाव यांच्या वतीने आगामी श्रामणेर शिबिराच्या नियोजनासाठी विश्वशांती बुद्ध विहार, अर्जुनी/मोरगाव येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आर. के. जांभुळकर होते. यावेळी सोमदास गणवीर, जनार्दन मेश्राम, श्रीकांत लोणारे, संजीव लोणारे, मोरेश्वर धारगावे, हिरालाल कोटांगळे आणि अजय शहारे उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आगामी श्रामणेर शिबिराच्या आयोजनासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिबिर यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन, पूर्वतयारी आणि संबंधित बाबींवर उपस्थितांनी आपली मते मांडली.
बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार, धम्मसंस्कार आणि नव्या पिढीमध्ये धम्मविषयक जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने श्रामणेर शिबिराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. बैठकीत उपस्थितांनी शिबिराच्या नियोजनाबाबत सकारात्मक चर्चा केली.

