कार्यकारी परिषदेत राजकुमार बडोले यांची नियुक्ती

wartaa.in
Share on

नागपूर : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू), नागपूरच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी माजी मंत्री तथा ज्येष्ठ समाजनेते राजकुमार बडोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्वोच्च निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या परिषदेत त्यांच्या समावेशामुळे विविध क्षेत्रांतील अनुभवाचा लाभ विद्यापीठाला मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.कार्यकारी परिषद ही विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, आर्थिक आणि प्रशासकीय धोरणांबाबत निर्णय घेणारी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, संशोधनाला चालना देणे, अभ्यासक्रम अद्ययावत करणे, विस्तार शिक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासंबंधी निर्णय घेण्यामध्ये या परिषदेची महत्त्वपूर्ण भूमिका असते.पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यविज्ञान क्षेत्राशी संबंधित विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठीही कार्यकारी परिषद मार्गदर्शक भूमिका बजावते. राजकुमार बडोले यांना सार्वजनिक जीवनातील प्रदीर्घ अनुभव असून सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या विकास प्रक्रियेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीचे विविध सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करत अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *