माजी मंत्री राजकुमार बडोले यांची बेहळीटोला (चिरचाडी) शाळेला भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
माजी मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी नुकतीच बेहळीटोला (चिरचाडी) येथील प्राथमिक शाळेला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
शाळेतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, त्यांची जिज्ञासा आणि निरागसता पाहून आपल्याही बालपणीच्या प्राथमिक शाळेतील आठवणींना उजाळा मिळाल्याचे आमदार राजकुमार बडोले यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी केवळ अभ्यासावरच भर न देता, त्यांच्या आवडी-निवडी, कलागुण आणि स्वप्नांना जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि प्रोत्साहन मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी याप्रसंगी नमूद केले.
या शाळा भेटीच्या वेळी पंचायत समितीचे उपसभापती निशाताई काशिवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अविनाशजी काशिवार, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री प्रशांतजी शहारे, शिशिरजी येडे, तसेच शाळेचे शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

