सडक अर्जुनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित नेहरूंच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

सडक अर्जुनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित नेहरूंच्या पुतळ्यांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न
Share on

सडक अर्जुनी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी महामानवांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांच्यासह नगरपंचायत अध्यक्ष तेजरामजी मडावी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सारंग खांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. अविनाश काशीवार, नगरपंचायत सभापती शाहिस्ता शेख, नगरसेवक देवचंद तरोणे, असलेष अंबादे, महेंद्र वंजारी, नगरसेविका शशिकलाताई टेंभुर्णे, दीक्षाताई भगत, गोपीचंद खेडकर आणि नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी युगल डडेमल उपस्थित होते.

तसेच, भाजप जिल्हा महामंत्री प्रशांत शहारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका महिला अध्यक्ष रजनीताई गिरेपुंजे, बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष विदेश टेंभुर्णे यांच्यासह भाग्यवान शहारे, रुपचंद खोब्रागडे, जयंत शहare, राहुल गणवीर, भोजराज रामटेके, प्रा. संतोष रामटेके, बिरला गणवीर शहारे, सरिताताई वैद्य, प्रमोद वैद्य, सदाराम लाडे यांसह नगरपंचायत कर्मचारी व नगरातील इतर प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतींना अभिवादन करत, त्यांच्या विचारांना सन्मान देणारे हे सौंदर्यीकरण कार्य निश्चितच सडक अर्जुनीच्या वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *