धोनीचं भविष्य अनिश्चित, संजू सॅमसनच्या पोस्टने चर्चांना पेटवले!

wartaa.in
Share on

चेन्नई सुपरकिंग्सचा चेहरा समजला जाणारा माजी कर्णधार एम. एस. धोनी IPL 2026 मध्ये खेळेल की नाही, यावर सध्या मोठी चर्चा रंगली आहे. वयाच्या 43 व्या वर्षीही फिटनेस राखणाऱ्या धोनीने “शारीरिक क्षमतेनुसार पुढील IPL खेळायचा निर्णय घेईन” असं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, चाहत्यांनी धोनीची संभाव्य रिप्लेसमेंट म्हणून संजू सॅमसनकडे पाहायला सुरुवात केली आहे. त्यात भर म्हणून संजू सॅमसनने नुकतीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांमध्ये चर्चेचा धागा सुरू केला आहे. पत्नीसोबत रस्ता ओलांडतानाचा फोटो शेअर करत त्याने “आता पुढे जायची वेळ आलीय” असं कॅप्शन दिलं आहे.

ही पोस्ट पाहून अनेकांनी अंदाज वर्तवायला सुरुवात केली आहे – संजू सॅमसन CSK चा नवा कर्णधार होणार का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *