गोंदिया, दि. 17 ऑक्टोबर :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या वतीने पंचायत समिती, गोंदिया येथे गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांच्यासोबत शिक्षकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रशासकीय कामे आणि नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या अडचणींबाबत सविस्तर डेलिगेशन घेण्यात आले. या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून अनेक महत्त्वाच्या बाबींवर सकारात्मक निर्णय व कार्यवाहीचे आश्वासन मिळाले. यावेळी पंचायत समितीचा कर्मचारी वर्ग, अखिल भारतीय शिक्षक संघाच्या राज्य संघटक नूतन बांगरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, राज्य प्रतिनिधी अनिरुद्ध मेश्राम व अय्यूब खान, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी तसेच तालुका व केंद्रस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवित्र पोर्टलद्वारे सन २०२६ मध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षणसेवकांची सेवापुस्तके तयार करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. ज्या शिक्षणसेवकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार आहेत, त्यांची सेवापुस्तके दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, गोंदिया येथे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. उर्वरित शिक्षणसेवकांची सेवापुस्तके दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी तयार करण्याचे ठरविण्यात आले. काही नवनियुक्त शिक्षकांच्या पदनिर्मितीची प्रक्रिया जिल्हास्तरावर पूर्ण झाली असली, तरी काही शिक्षकांचे शालार्थ आयडी अद्याप तयार झालेले नाहीत. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरावरील संबंधित प्रक्रिया पूर्ण करून सर्व नवनियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे सांगण्यात आले. महिला शिक्षकांच्या सेवापुस्तकातील नावांमध्ये कुमारी व सौ या उल्लेखांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, तसेच राजपत्रानुसार नावबदल करण्याच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. पंचायत समिती, गोंदिया येथे प्राप्त होणारे संबंधित प्रस्ताव तपासून ते तातडीने जिल्हा परिषद, गोंदिया येथे मंजुरीसाठी पाठविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. Article Image शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तसेच स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. स्वयंपाकी व मदतनीसांच्या एप्रिल महिन्याच्या मानधनाची रक्कम त्याच दिवशी सायंकाळपर्यंत खात्यावर जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उर्वरित अनुदान प्राप्त होताच ते संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. दर महिन्याला आयोजित होणाऱ्या शिक्षण परिषदेच्या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत शाळा आणि दुपारी १२ ते ५ या वेळेत शिक्षण परिषद होत असल्याने शिक्षकांचा संपूर्ण दिवस कामात जातो. त्यामुळे शिक्षण परिषदेच्या दिवशी शाळेच्या वेळेत सवलत देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. हा विषय जिल्हास्तराशी संबंधित असल्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले. सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी व अद्ययावतीकरण शिक्षकांच्या सेवापुस्तकांतील नोंदी, आवश्यक स्वाक्षऱ्या, वेतनविषयक नोंदी आणि इतर प्रशासकीय बाबींची पडताळणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दिवाळीनंतर एक दिवस निश्चित करून केंद्रनिहाय शिक्षकांना पंचायत समिती, गोंदिया येथे बोलावून संबंधित लिपिकांच्या मार्गदर्शनाखाली सेवापुस्तके अद्ययावत करण्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. शिक्षकांच्या उच्च परीक्षा, पूर्वपरवानगी, कार्योत्तर परवानगी तसेच हिंदी-मराठी सूट आणि संगणक सूट यासंबंधीच्या प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. पंचायत समितीमध्ये प्राप्त झालेले परीक्षा परवानगीचे अर्ज पुढील आठ दिवसांत मंजुरीसाठी कार्यवाहीत आणण्यात येतील, असे सांगण्यात आले. ज्या शिक्षकांचे अर्ज अद्याप सादर झालेले नाहीत, त्यांनी ते लवकरात लवकर पंचायत समिती, गोंदिया येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले. संबंधित सूट प्रस्तावांवरही तातडीने कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली. चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीच्या काही प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने ते जिल्हा परिषदेकडून परत आल्याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषद, गोंदिया येथे पाठविण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच ज्यांच्या सेवेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांनी नवीन प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीमध्ये सादर करावेत, जेणेकरून ते मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविता येतील. मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर जमा होणारे गणवेश अनुदान, शालेय पोषण आहार व इतर शालेय निधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणवेश अनुदानाचे ६० टक्के व ४० टक्के असे दोन्ही टप्प्यांतील निधी प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. संबंधित निधी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. शासनाकडून इतर शालेय अनुदान प्राप्त झाल्यानंतर तेही संबंधित खात्यांवर जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. वैद्यकीय रजा, प्रसूती रजा व इतर रजा प्रकरणे शिक्षकांच्या वैद्यकीय रजा, प्रसूती रजा आणि इतर रजांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करून ती निकाली काढण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहू नयेत, यासाठी त्यांची तपासणी करून आवश्यक स्वाक्षऱ्यांसह ते तातडीने जिल्हा परिषद, गोंदिया येथे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर संबंधित कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, प्रलंबित कामांचा अनावश्यक विलंब टाळावा आणि शिक्षकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे, यावर संघटनेने भर दिला. नवनियुक्त शिक्षणसेवकांना सेवापुस्तकांचे वितरण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे सन २०२६ मध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षणसेवकांना सेवापुस्तकांचे वितरण करण्यात आले. सेवापुस्तक हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवाविषयक नोंदींसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. छाया रहांगडाले, साक्षी भोयर, रश्मी पाली, कविता कावडे, रंजना शिरसाट, शीतल राठोड,, हेमंत हुमे, प्रतिमा खिरेकर, उषा आचरे, पल्लवी जनबंधू , विलास शहारे, संजूबाई डोहरे, अंकिता कांबळे , रानी बोरकर, प्रीती सरजारे , लेखा ठाकरे, एकता चुटे, योगेश्वरी बिसेन, महेंद्र हरिनखेडे, पूजा पटेल, अश्विनी माने, ज्योती वाल्दे, श्रुती धारगावे, ज्योती ठाकूर, स्वप्नाली मोरे, प्रीती लिमकर , शेख अफरीन अब्दुल वहीद, सोनाली शेंडे, वर्षा बिसेन, पुष्पा रहांगडाले , प्रीती साखरे, सुप्रिया मागाडे , ईश्वरदेवी बोपचे, राजू नाईकराव , रश्मी पगाडे, पूनम जाधव, प्रियांका झंझाड, विजूताई बिसेन, पूजा लांजेवार, निशद बिसेन, तोरना मस्के, वैशाली रंगारी, निकिता दमाहे, योगिता मोरे, भुमेश्वरी चौधरी, शिल्पा रामटेके, भूमेश्वरी ठाकूर, माधवी कोडगुले आणि मुकुंद पारधी या नवनियुक्त शिक्षणसेवकांना सेवापुस्तकासंबंधी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेची सुरुवात करण्यास मदत होणार आहे. या डेलिगेशनमध्ये अखिल भारतीय शिक्षक संघाच्या राज्य संघटक नूतन बांगरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, राज्य प्रतिनिधी अनिरुद्ध मेश्राम व अय्यूब खान, जिल्हा कार्यकारिणीचे हेमंत पटले, विनोद लिचडे, सुनील सोनवाने, गणेश चुटे, लिकेश हिरापुरे, राजेंद्र निमबार्ते, सचिन धोपेकर व नरेंद्र घायवट उपस्थित होते.संघाचे अध्यक्ष मोरेश्वर बडवाईक, तालुका नेते योगानंद पटले, सरचिटणीस चंदु दुर्गे, देवेंद्र जतपेले, राजेश मोहनकर, मनिष राठोड, निरंजन सोनकल्याणी, विरेंद्र कावडे, डोमेन्द्र रहांगडाले, राजेश ब्राह्मण, कोटेश्वर कावडे, माधव हांडे, अरुण कटरे, नंदू चित्रीव, संतोष टेम्भरे, शैलेश गौतम, संतोष चित्रिव, तेजकुमार बिसेन, मनीष बलभद्रे, प्रकाश उरकुडे, विजय लिल्हारे, सतीश राऊत, विलास धकाते, प्रवीण राठोड, मुक्तानंद फड, टेकचंद चौधरी, हौसिंलाल रहांगडाले, हर्ष पवार, दत्तात्रय बागडे, ओमप्रकाश रहांगडाले, सुनील चौरगडे, रमेश सर्वे, एम. एन. उके, हिवराज वाघमारे, शिवशंकर डेकाटे, पितांबर फंडे, संतोष बिसेन, रामेश्वर नंदने, लालचंद भैसारे, राजेश पटले, देवेंद्र कोल्हे, महेंद्र कस्तुरे, राजू गोखे, माणिकलाल घाटघुमर, संजय भावे, गिरीश अग्रवाल, नुतेंद्र सुलाखे, अजय डोंगरे, नितेश जांभुडकर, कीर्तिमंत चांदेकर, राजेश गौतम, प्रदीप जाधव, अजय खांडेकर, सुरेश श्रीवास्तव, राजकुमार चंदेल, विजय वैद्य, सावलराम बिसेन, केशव मानकर, विनय बघेले, टेकेश्वर बिसेन, संदीप पिहरे, रामरतन रेला, सतीश नागपुरे, भूषण लोहारे, महेश कोरे, उमेश भगत, प्रमोद भांदकर, दिलीप हरिनखडे, बालमुकुंद फुले, तायमलाल मानकर, एम. ओ. रहांगडाले, चरण सूर्यवंशी, प्रेम नखाते, फिरोज पठाण, लीलाधर बनसोडे, संजय बिसेन व माधव रोडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष यशोदरा सोनवाने, कार्याध्यक्ष नितू डहाट, यशवंती लिखार, रेखा चौधरी, सरिता देवतारे, अनिता फॅब्यानी, स्फूर्ती बन्सोड, भारती पटले, तरन्नुम शेख, स्नेहल तारोने, सिंधू मोटघरे, योगिता पटले, उर्मिला गजभिये, रंजना बैस, धर्मशीला शरणागते, संगीता पंडित, वर्षा श्रीभद्रे, रोमा गोंडाने, कल्पना रहांगडाले, ज्योती फड, स्मिता मच्छीरके, पंचशीला जनबंधू, वैशाली पेटकर, योगिता बुरडकर, जयश्री तारोने, वर्षा बागडे, वैशाली मेश्राम, ललिता चौधरी, ललिता राऊत, गीता बोपचे, माया बोपचे, वैशाली लांबट, ममता टेम्भरे, मोना बडवाईक, चित्रारेखा ठाकरे, मनीषा ठाकरे, रोहिणी देशमुख, पूजा डोमाळे, पूनम पाटील, ईश्वरी परिहार, शशिकला डोंगरवार, प्रीती भालाधारे, परमेश्वरी पतेह, मनोरमा राऊत, नेहा गजभिये, रेखा रहांगडाले, लक्ष्मी तूरकर, लक्ष्मी सराटे, विनिता श्रीवास्तव, अफरोज खान व प्रभावती बैस यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटना कटिबद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या वतीने आयोजित या डेलिगेशनमध्ये शिक्षकांच्या सेवाविषयक, आर्थिक, प्रशासकीय आणि वैयक्तिक अडचणी मांडण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. काही कामांसाठी निश्चित तारखा व कालमर्यादा ठरविण्यात आल्या, तर जिल्हास्तरावरील विषयांबाबत पुढील पाठपुरावा करण्याचे ठरले. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न करणे, नवनियुक्त शिक्षणसेवकांना प्रशासकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावणे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया सदैव प्रयत्नशील राहील, असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

wartaa.in
Share on

स्थान: गोंदिया

# गोंदिया शिक्षक समस्या: सेवापुस्तके, शालार्थ आयडी आणि प्रलंबित अनुदानासाठी संघटनेचे प्रशासनासोबत महत्त्वाचे निर्णय

शिक्षकांच्या शैक्षणिक जबाबदाऱ्यांइतकेच त्यांच्या सेवाविषयक नोंदी, वेतन, रजा आणि प्रशासकीय कामांचे वेळेत निराकरण होणेही महत्त्वाचे आहे. या कामांमध्ये विलंब झाल्यास शिक्षकांसह शाळांच्या दैनंदिन व्यवस्थापनावरही परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या शिष्टमंडळाने पंचायत समिती, गोंदिया येथे गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत नवनियुक्त शिक्षणसेवकांची सेवापुस्तके, शालार्थ आयडी, शालेय अनुदान, वेतनश्रेणी आणि रजा प्रकरणांसह अनेक मुद्द्यांवर कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्याची माहिती संघटनेने दिली.

## नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या सेवापुस्तकांसाठी विशेष नियोजन

पवित्र पोर्टलद्वारे २०२६ मध्ये नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांची सेवापुस्तके तयार करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार असलेल्या शिक्षणसेवकांची सेवापुस्तके १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, गोंदिया येथे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. उर्वरित शिक्षणसेवकांसाठी २२ ऑक्टोबर २०२६ ही तारीख निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

काही नवनियुक्त शिक्षकांच्या पदनिर्मितीची प्रक्रिया जिल्हास्तरावर पूर्ण झाली असली, तरी त्यांचे शालार्थ आयडी तयार होणे बाकी असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. संबंधित प्रक्रिया पूर्ण करून सर्व नवनियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकरच केली जाईल, असे आश्वासन मिळाल्याची माहिती देण्यात आली.

## महिला शिक्षकांच्या नावबदलाच्या प्रस्तावांवर चर्चा

महिला शिक्षकांच्या सेवापुस्तकांमध्ये ‘कुमारी’ आणि ‘सौ.’ या उल्लेखांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी तसेच राजपत्रानुसार नावबदल करण्याच्या प्रस्तावांवर बैठकीत चर्चा झाली. पंचायत समिती, गोंदिया येथे प्राप्त होणारे प्रस्ताव तपासून ते मंजुरीसाठी जिल्हा परिषदेकडे तातडीने पाठविण्यात येतील, असे सांगण्यात आले.

शिक्षकांच्या सेवापुस्तकांतील नोंदी अचूक आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे. नाव, जन्मतारीख, नियुक्ती, वेतन आणि इतर सेवाविषयक नोंदींमधील त्रुटी भविष्यातील प्रशासकीय प्रक्रियेत अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे अशा प्रस्तावांचे वेळेत निराकरण करण्याची मागणी संघटनेने केली.

## पोषण आहार अनुदान आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा प्रश्न

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तसेच स्वयंपाकी आणि मदतनीसांच्या मानधनाबाबतही चर्चा करण्यात आली. एप्रिल महिन्याचे मानधन त्याच दिवशी सायंकाळपर्यंत संबंधितांच्या खात्यावर जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उर्वरित अनुदान प्राप्त होताच ते मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कार्यवाही केली जाईल, असे सांगण्यात आले.

गणवेश अनुदानाबाबत ६० टक्के आणि ४० टक्के असे दोन्ही टप्प्यांतील निधी प्राप्त झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. हा निधी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. शासनाकडून इतर शालेय अनुदाने प्राप्त झाल्यानंतर तीही संबंधित खात्यांवर वर्ग करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

शालेय निधी वेळेत उपलब्ध झाल्यास शाळांना नियोजनबद्ध पद्धतीने आवश्यक खर्च करता येतो. त्यामुळे निधी वितरणातील विलंब टाळणे आणि त्याबाबत स्पष्ट माहिती देणे महत्त्वाचे ठरते.

## सेवापुस्तक पडताळणी आणि परीक्षा परवानगीचे प्रस्ताव

सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तकांतील नोंदी, आवश्यक स्वाक्षऱ्या आणि वेतनविषयक तपशीलांची पडताळणी करण्याबाबत चर्चा झाली. दिवाळीनंतर एक दिवस निश्चित करून केंद्रनिहाय शिक्षकांना पंचायत समितीत बोलावून संबंधित लिपिकांच्या मार्गदर्शनाखाली सेवापुस्तके अद्ययावत करण्याचे नियोजन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.

उच्च परीक्षा, पूर्वपरवानगी, कार्योत्तर परवानगी तसेच हिंदी-मराठी आणि संगणक सूट यांसंबंधीचे प्रलंबित प्रस्तावही बैठकीत चर्चिले गेले. पंचायत समितीत प्राप्त झालेले परीक्षा परवानगीचे अर्ज पुढील आठ दिवसांत मंजुरीसाठी कार्यवाहीत आणण्यात येतील, असे सांगण्यात आले. अर्ज सादर न केलेल्या शिक्षकांनी ते लवकरात लवकर जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले.

चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीच्या काही प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने ते जिल्हा परिषदेकडून परत आल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. त्रुटी दूर करून प्रस्ताव पुन्हा पाठविण्यात येतील, असे सांगण्यात आले. सेवेला १२ वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रांसह नवीन प्रस्ताव सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले.

## रजा, वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि शिक्षण परिषदेचा प्रश्न

शिक्षकांच्या वैद्यकीय रजा, प्रसूती रजा आणि इतर प्रलंबित रजा प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहू नयेत, यासाठी त्यांची तपासणी करून आवश्यक स्वाक्षऱ्यांसह जिल्हा परिषदेकडे तातडीने पाठविण्याबाबतही चर्चा झाली.

दरम्यान, शिक्षण परिषदेच्या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत शाळा आणि दुपारी १२ ते ५ या वेळेत परिषद होत असल्याने शिक्षकांचा संपूर्ण दिवस व्यस्त जातो. त्यामुळे त्या दिवशी शाळेच्या वेळेत सवलत देण्याची मागणी संघटनेने केली. हा विषय जिल्हास्तराशी संबंधित असल्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले.

## नवनियुक्त शिक्षकांना सेवापुस्तकांचे वितरण

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे २०२६ मध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षणसेवकांना सेवापुस्तकांचे वितरण करण्यात आले. सेवापुस्तक हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवाविषयक नोंदींसाठी महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने या उपक्रमामुळे नव्या शिक्षकांना प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यास मदत होणार आहे.

या बैठकीला अखिल भारतीय शिक्षक संघाच्या राज्य संघटक नूतन बांगरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, राज्य प्रतिनिधी अनिरुद्ध मेश्राम व अय्यूब खान, जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला कार्यकारिणीच्या प्रतिनिधी तसेच केंद्रस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

## आश्वासनांची अंमलबजावणी महत्त्वाची

या डेलिगेशनमध्ये शिक्षकांच्या सेवाविषयक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी मांडण्यात आल्या. काही कामांसाठी निश्चित तारखा आणि कालमर्यादा ठरविण्यात आल्या, तर जिल्हास्तरावरील विषयांवर पुढील पाठपुरावा करण्याचे ठरले.

आता सेवापुस्तके तयार करणे, शालार्थ आयडी निर्माण करणे, अनुदान वितरण आणि प्रलंबित प्रस्ताव निकाली काढणे या बाबींमध्ये प्रत्यक्ष किती वेगाने कार्यवाही होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिक्षकांची प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण झाल्यास त्यांना अनावश्यक पाठपुरावा कमी करावा लागेल आणि शैक्षणिक कामांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.#GondiaTeachers #TeacherIssues #EducationAdministration #wartaa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *