नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव्य प्रभावीपणे मांडता येते आमदार राजकुमार बडोले

नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव्य प्रभावीपणे मांडता येते आमदार राजकुमार बडोले
Share on

वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.माहागांव

नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव्य प्रभावीपणे मांडता येते

आमदार राजकुमार बडोले

महागाव येथे ‘खेळ कुणाला कळला का?’ नाट्यप्रयोगाला नागरिकांचा प्रतिसाद

अर्जुनी मोरगाव :
समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करून जनजागृती घडवून आणण्याचे सामर्थ्य नाटक या कलाप्रकारात आहे. नाटकाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव प्रभावीपणे मांडता येते. त्यामुळे नाटक हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम असून, गावागावांत आयोजित करण्यात येणाऱ्या नाट्यप्रयोगांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असतो, असे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी केले.

सार्वजनिक महिला मंडळ, महागाव यांच्या वतीने ‘खेळ कुणाला कळला का?’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना आमदार बडोले बोलत होते.

नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील विविध समस्या, मानवी स्वभाव, सामाजिक परिस्थिती आणि वास्तव यांचे दर्शन घडविणारे प्रभावी माध्यम आहे. नाटकातून समाजाला विचार करण्याची दिशा मिळते, तसेच सामाजिक जाणीव आणि जनजागृती निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे अशा सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

ग्रामीण भागात नाट्यकलेची समृद्ध परंपरा असून, स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषय लोकांसमोर मांडले जातात. अशा उपक्रमांमुळे मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाचे कार्यही साध्य होत असल्याचे त्यांनी सांगितले

नाटकाचे उद्घाटन अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि.राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, विजयाताई कापगते, जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यशवंत परशुरामकर, निर्मला नाकाडे, देवेंद्रबाई मस्के, संगीता नाकाडे, शिलाताई उईके, रामचंद्र देशमुख, प्राण गोपालदास, टीकाराम नाकाडे,अरुण देशमुख, रामभाऊ केसरवानी आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *