अर्जुनी मोरगावमध्ये माणुसकीचा महापूर! दुकानाला आग लागताच संपूर्ण गाव मदतीसाठी धावले:
वार्ताहर : अजय शहारे | अर्जुनी/मोर.
🔥 अर्जुनी मोरगावमध्ये माणुसकीचा महापूर! दुकानाला आग लागताच संपूर्ण गाव मदतीसाठी धावले; नगरपंचायत, पोलीस प्रशासन, व्यापारी व युवकांची उल्लेखनीय कामगिरी!
अर्जुनी मोरगाव | प्रतिनिधी
आज सायंकाळी धर्मेंद्रजी पालीवाल यांच्या दुकानाला अचानक आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. आगीची बातमी संपूर्ण गावात पसरताच अर्जुनी मोरगावातील नागरिक, व्यापारी बांधव, नगरपंचायत कर्मचारी, पोलीस प्रशासन तसेच सामाजिक व युवा कार्यकर्त्यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. विशेष म्हणजे, घटनेची माहिती मिळताच अनेक व्यापारी मित्रांनी आपापली दुकाने बंद करून मदतीसाठी घटनास्थळी हजेरी लावली. सर्वांनी एकत्रितपणे मदतकार्य करत माणुसकी, सामाजिक बांधिलकी आणि गावाच्या एकजुटीचे उत्तम उदाहरण निर्माण केले.
या प्रसंगी नगरपंचायत अर्जुनी मोरगावचे कर्मचारी दुर्योधनजी नेवारे, शुभम बोरकर, मिथुन कोचे आणि धनंजय कलबांधे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मोलाचे सहकार्य केले. तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणारे राहुल शहारे आणि अजय पाशिने यांचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
या मदतकार्यात विशेष व्यापारी मित्र म्हणून डिफेन्स फिटनेस क्लबचे मालक अनिलजी मेहता, माँ साडी सेंटरचे मालक दीपक जोक्यानी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधांशु मेहता, Youth In Action चे सचिव नयन रुखमोडे, Youth In Action संस्थेचे विभाग प्रमुख खुशाल शहारे, व्यावसायिक संजय जैस्वाल, व्यावसायिक मुकेश जैस्वाल, मयंक जैस्वाल, चिराग पाशिने यांनी आपली दुकाने बंद करून मदतीसाठी धाव घेतली.
तसेच सामाजिक कार्यकर्ते शशांक जैस्वाल, प्रतीक मेहता, प्रतीक साखरे, यशकुमार शहारे (नगरसेवक), अनुज जांभुळकर, पवन चौहान, खुशाल शहारे, धर्मू लड्डा, पिंटू जिवानी आणि अनिकेत कडसरपे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी या मदतकार्यात सहभागी झाले.
विशेष म्हणजे, नगरपंचायत अर्जुनी मोरगावचे कर्मचारी, महाराष्ट्र पोलीस प्रशासन आणि गावकऱ्यांच्या संयुक्त सहकार्याने परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यामध्ये येर्ने मेजर, PSI कटासकर, यादव मेजर, तारम, मेश्राम, सोनकुत्रे, पर्वते, सिदाम आणि सावरकर या पोलीस बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.
या संपूर्ण घटनेत व्यापारी बांधवांनी स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून दाखवलेली तत्परता, नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी बजावलेली जबाबदारी, पोलीस प्रशासनाचे सहकार्य आणि गावकऱ्यांनी दाखवलेली एकजूट खरोखरच कौतुकास्पद आहे.
संकट कोणावरही येऊ शकते, मात्र संकटाच्या वेळी संपूर्ण गाव एक कुटुंब म्हणून उभे राहते, हीच अर्जुनी मोरगावची खरी ताकद आहे!
या मदतकार्यात सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाचे, व्यापारी बांधवांचे, नगरपंचायत कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन!
एकजूट, माणुसकी आणि सहकार्य – हीच अर्जुनी मोरगावची खरी ओळख!

