पेंच व्याघ्र प्रकल्पात ‘सोलर बोट सफारी’ सुरू; केरळहून दाखल झाल्या दोन प्रीमियम बोटी

पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी दाखल झालेली सोलर बोट.
Share on

पर्यटकांना आता सौरऊर्जेवर चालणाऱ्या शांत बोटीतून पाण्यातून वन्यजीव पाहण्याची संधी मिळणार

नागपूर: जंगलात जिप्सीमधून वाघाच्या मागावर जाण्याच्या अनुभवानंतर आता पर्यटकांना पेंच व्याघ्र प्रकल्पात सौरऊर्जेवर चालणाऱ्या शांत बोटीतून वन्यजीव पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात २०२६-२७ च्या पर्यटन हंगामासाठी ‘सोलर बोट सफारी’ सुरू करण्यात आली आहे.

या सफारीसाठी केरळहून प्रत्येकी २४ पर्यटक क्षमतेच्या दोन प्रीमियम सोलर बोटी दाखल झाल्या आहेत. या बोटी पर्यटकांना पेंचच्या जलविश्वाची सफर घडवणार आहेत. यामुळे वाघ, गवे, चितळ किंवा मोर नदीकाठी पाणी पिण्यासाठी आलेले असताना त्यांना पाण्यातून थेट पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *