कॉकपिटमध्ये शौर्य गाजवणारे कॅप्टन स्मित मच्छार खरे नायक; राजकुमार बडोले
जखमी असतानाही प्रवाशांचे प्राण वाचवण्याची संधी निर्माण करणाऱ्या वैमानिकाचे माजी मंत्र्यांकडून कौतुक
विमानाच्या कॉकपिटमध्ये वार झाल्यानंतरही असीम धैर्य दाखवून विमान वाचवण्यास मदत करणारे कॅप्टन स्मित मच्छार यांचे महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी कौतुक केले आहे. संकटाच्या क्षणी घाबरून न जाता कॅप्टन मच्छार यांनी दाखवलेले धाडस हे मानवतेचे सर्वोच्च उदाहरण असल्याचे बडोले यांनी म्हटले आहे.
कॉकपिटमधील हल्ल्यानंतरही दाखवले असीम धैर्य
राजकुमार बडोले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉकपिटमध्ये झालेल्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतरही कॅप्टन स्मित मच्छार यांनी भीतीवर मात केली. त्यांनी परिस्थितीचा खंबीरपणे प्रतिकार करत कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवासी व क्रू मेंबर्सना विमान सुरक्षित करण्याची संधी दिली.
मानवतेचे सर्वोच्च उदाहरण: राजकुमार बडोले
कॅप्टन स्मित मच्छार यांचे हे कृत्य केवळ वैमानिकी कर्तव्य नसून मानवतेचे सर्वोच्च उदाहरण आहे, असे बडोले यांनी नमूद केले. अशा शूर वैमानिकाचे नाव आणि त्यांचे शौर्य प्रत्येकाने स्मरणात ठेवले पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी मच्छार यांच्या धैर्याला सलाम केला.

