साहिल वाकोडे प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; आमदार राजकुमार बडोले यांचे आश्वासन

wartaa.in
Share on

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्याच्या आत्महत्येची निष्पक्ष चौकशी करण्याची पालकांची मागणी; आझाद मैदानात उपोषण सुरू

आयआयटी मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी त्याचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आमदार राजकुमार बडोले यांनी उपोषणकर्त्या पालकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असून याप्रकरणी लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आझाद मैदानावर कुटुंबीयांची घेतली भेट

आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या प्रमुख मागणीसाठी साहिलचे आई-वडील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत.

या आंदोलनाची दखल घेत आमदार राजकुमार बडोले यांनी ३० सप्टेंबर रोजी आझाद मैदानावर जाऊन वाकोडे कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.

पोलिस आयुक्तांशी चर्चा, लवकरच मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

या प्रकरणासंदर्भात पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असल्याची माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली.

तसेच, वाकोडे कुटुंबीयांच्या मागण्या शासनदरबारी मांडण्यासाठी लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *