नागपुरात ‘प्रबुद्ध भारत’ राष्ट्रीय परिषदेचे आयोजन; नोंदणी प्रक्रिया सुरू
वार्ताहर : Super Admin | विदर्भ
'प्रबुद्ध भारत' राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
नागपूर येथे 'प्रबुद्ध भारत' (The Enlightened India: Gen Z & Gen Alpha) या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील परिषद अर्थात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय परिषदेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
परिषदेचा दिनांक आणि ठिकाण
या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन खालील वेळेत व ठिकाणी निश्चित करण्यात आले आहे:
* दिनांक: १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६
* स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, ८९, कामठी रोड, लाल गोडाऊन जवळ, वैशाली नगर, नवी इंदोरा, नागपूर.
नोंदणी कशी करावी?
या परिषदेत सहभागी होण्यासाठी इच्छुक प्रतिनिधींना ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यासाठी अधिकृत नोंदणी अर्ज https://rcc.nspirehost.com/ या संकेतस्थळ लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

