‘महाकाव्य श्री रामायण कथा’मधील वानर सेनेच्या चष्म्यावरून वाद; निर्मात्यांनी केला खुलासा

‘महाकाव्य श्री रामायण कथा’मध्ये वानर सेनेतील एका व्यक्तीने चष्मा घातल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेले छायाचित्र.
Share on

सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दाखवून दिल्या एडिटिंगमधील चुका

अभिषेक सिंह दिग्दर्शित ‘महाकाव्य श्री रामायण कथा’ या चित्रपटातील एका दृश्यावरून सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटातील वानर सेनेतील एका व्यक्तीने चष्मा घातल्याचे दृश्यात दिसून आल्याने सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला आहे. या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून अनेकांनी यावरून चित्रपटाला ट्रोल केले आहे.

सोशल मीडियावरील नेटकऱ्यांनी चित्रपटातील एडिटिंगच्या अनेक त्रुटी आणि चुका समोर आणल्या आहेत. पौराणिक कथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात वानर सेनेतील पात्राने चष्मा घातल्याचे दिसल्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर आता ‘महाकाव्य श्री रामायण कथा’च्या निर्मात्यांनी या संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *