ठळक बातम्या
wartaa.in

गोंदिया रस्ते विकास: बालाघाट टी पॉईंटवर एलिव्हेटेड रोटरी, चौपदरीकरण आणि बायपाससाठी हालचालींना वेग

A high-level meeting in Gondia reviewed key road infrastructure proposals, including an elevated rotary at Balaghat T Point, four-laning of the Kohmara-Ghoti and Ghoti-Gondia routes, a feasibility study for a Gondia bypass, and measures to expedite pending railway overbridges in Gondia and Bhandara districts.

Read More
wartaa.in

ओबीसींच्या २५ मागण्या: जातनिहाय जनगणना, आरक्षण संरक्षण आणि महाज्योतीच्या निध्यासाठी सोलापुरातून राज्य सरकारला निवेदन

The OBC Samaj Sangharsh Samiti in Solapur submitted a memorandum outlining 25 demands, including a separate caste census, reservation backlog clearance, education support, increased Mahajyoti funding, employment assistance and welfare measures for nomadic and disadvantaged communities. The committee warned of statewide protests if the government fails to act.

Read More
wartaa.in

गोंदिया, दि. 17 ऑक्टोबर :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या वतीने पंचायत समिती, गोंदिया येथे गटशिक्षणाधिकारी एम. एल. मेश्राम यांच्यासोबत शिक्षकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रशासकीय कामे आणि नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या अडचणींबाबत सविस्तर डेलिगेशन घेण्यात आले. या बैठकीत शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून अनेक महत्त्वाच्या बाबींवर सकारात्मक निर्णय व कार्यवाहीचे आश्वासन मिळाले. यावेळी पंचायत समितीचा कर्मचारी वर्ग, अखिल भारतीय शिक्षक संघाच्या राज्य संघटक नूतन बांगरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, राज्य प्रतिनिधी अनिरुद्ध मेश्राम व अय्यूब खान, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, महिला कार्यकारिणीच्या पदाधिकारी तसेच तालुका व केंद्रस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवित्र पोर्टलद्वारे सन २०२६ मध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षणसेवकांची सेवापुस्तके तयार करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. ज्या शिक्षणसेवकांची वैद्यकीय प्रमाणपत्रे तयार आहेत, त्यांची सेवापुस्तके दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती सभागृह, गोंदिया येथे तयार करण्याचे नियोजन करण्यात आले. उर्वरित शिक्षणसेवकांची सेवापुस्तके दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी तयार करण्याचे ठरविण्यात आले. काही नवनियुक्त शिक्षकांच्या पदनिर्मितीची प्रक्रिया जिल्हास्तरावर पूर्ण झाली असली, तरी काही शिक्षकांचे शालार्थ आयडी अद्याप तयार झालेले नाहीत. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हास्तरावरील संबंधित प्रक्रिया पूर्ण करून सर्व नवनियुक्त शिक्षकांचे शालार्थ आयडी तयार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे सांगण्यात आले. महिला शिक्षकांच्या सेवापुस्तकातील नावांमध्ये कुमारी व सौ या उल्लेखांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी, तसेच राजपत्रानुसार नावबदल करण्याच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. पंचायत समिती, गोंदिया येथे प्राप्त होणारे संबंधित प्रस्ताव तपासून ते तातडीने जिल्हा परिषद, गोंदिया येथे मंजुरीसाठी पाठविण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. Article Image शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रलंबित अनुदान तसेच स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनाबाबत चर्चा करण्यात आली. स्वयंपाकी व मदतनीसांच्या एप्रिल महिन्याच्या मानधनाची रक्कम त्याच दिवशी सायंकाळपर्यंत खात्यावर जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उर्वरित अनुदान प्राप्त होताच ते संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. दर महिन्याला आयोजित होणाऱ्या शिक्षण परिषदेच्या दिवशी सकाळी ७ ते ११ या वेळेत शाळा आणि दुपारी १२ ते ५ या वेळेत शिक्षण परिषद होत असल्याने शिक्षकांचा संपूर्ण दिवस कामात जातो. त्यामुळे शिक्षण परिषदेच्या दिवशी शाळेच्या वेळेत सवलत देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. हा विषय जिल्हास्तराशी संबंधित असल्याने वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिले. सर्व शिक्षकांच्या सेवापुस्तकांची पडताळणी व अद्ययावतीकरण शिक्षकांच्या सेवापुस्तकांतील नोंदी, आवश्यक स्वाक्षऱ्या, वेतनविषयक नोंदी आणि इतर प्रशासकीय बाबींची पडताळणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दिवाळीनंतर एक दिवस निश्चित करून केंद्रनिहाय शिक्षकांना पंचायत समिती, गोंदिया येथे बोलावून संबंधित लिपिकांच्या मार्गदर्शनाखाली सेवापुस्तके अद्ययावत करण्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. शिक्षकांच्या उच्च परीक्षा, पूर्वपरवानगी, कार्योत्तर परवानगी तसेच हिंदी-मराठी सूट आणि संगणक सूट यासंबंधीच्या प्रलंबित प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. पंचायत समितीमध्ये प्राप्त झालेले परीक्षा परवानगीचे अर्ज पुढील आठ दिवसांत मंजुरीसाठी कार्यवाहीत आणण्यात येतील, असे सांगण्यात आले. ज्या शिक्षकांचे अर्ज अद्याप सादर झालेले नाहीत, त्यांनी ते लवकरात लवकर पंचायत समिती, गोंदिया येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले. संबंधित सूट प्रस्तावांवरही तातडीने कार्यवाही करण्याबाबत चर्चा झाली. चटोपाध्याय वरिष्ठ वेतनश्रेणीच्या काही प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने ते जिल्हा परिषदेकडून परत आल्याबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषद, गोंदिया येथे पाठविण्यात येतील, असे सांगण्यात आले. तसेच ज्यांच्या सेवेला १२ वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा शिक्षकांनी नवीन प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समितीमध्ये सादर करावेत, जेणेकरून ते मंजुरीसाठी जिल्हास्तरावर पाठविता येतील. मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर जमा होणारे गणवेश अनुदान, शालेय पोषण आहार व इतर शालेय निधी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणवेश अनुदानाचे ६० टक्के व ४० टक्के असे दोन्ही टप्प्यांतील निधी प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. संबंधित निधी मुख्याध्यापकांच्या खात्यावर जमा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल. शासनाकडून इतर शालेय अनुदान प्राप्त झाल्यानंतर तेही संबंधित खात्यांवर जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले. वैद्यकीय रजा, प्रसूती रजा व इतर रजा प्रकरणे शिक्षकांच्या वैद्यकीय रजा, प्रसूती रजा आणि इतर रजांच्या प्रलंबित प्रकरणांबाबत चर्चा करण्यात आली. संबंधित प्रकरणांवर आवश्यक कार्यवाही करून ती निकाली काढण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित राहू नयेत, यासाठी त्यांची तपासणी करून आवश्यक स्वाक्षऱ्यांसह ते तातडीने जिल्हा परिषद, गोंदिया येथे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली. या सर्व विषयांवर संबंधित कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांना योग्य मार्गदर्शन मिळावे, प्रलंबित कामांचा अनावश्यक विलंब टाळावा आणि शिक्षकांच्या समस्यांचे वेळेत निराकरण व्हावे, यावर संघटनेने भर दिला. नवनियुक्त शिक्षणसेवकांना सेवापुस्तकांचे वितरण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या वतीने पवित्र पोर्टलद्वारे सन २०२६ मध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्त शिक्षणसेवकांना सेवापुस्तकांचे वितरण करण्यात आले. सेवापुस्तक हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवाविषयक नोंदींसाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना ते उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. छाया रहांगडाले, साक्षी भोयर, रश्मी पाली, कविता कावडे, रंजना शिरसाट, शीतल राठोड,, हेमंत हुमे, प्रतिमा खिरेकर, उषा आचरे, पल्लवी जनबंधू , विलास शहारे, संजूबाई डोहरे, अंकिता कांबळे , रानी बोरकर, प्रीती सरजारे , लेखा ठाकरे, एकता चुटे, योगेश्वरी बिसेन, महेंद्र हरिनखेडे, पूजा पटेल, अश्विनी माने, ज्योती वाल्दे, श्रुती धारगावे, ज्योती ठाकूर, स्वप्नाली मोरे, प्रीती लिमकर , शेख अफरीन अब्दुल वहीद, सोनाली शेंडे, वर्षा बिसेन, पुष्पा रहांगडाले , प्रीती साखरे, सुप्रिया मागाडे , ईश्वरदेवी बोपचे, राजू नाईकराव , रश्मी पगाडे, पूनम जाधव, प्रियांका झंझाड, विजूताई बिसेन, पूजा लांजेवार, निशद बिसेन, तोरना मस्के, वैशाली रंगारी, निकिता दमाहे, योगिता मोरे, भुमेश्वरी चौधरी, शिल्पा रामटेके, भूमेश्वरी ठाकूर, माधवी कोडगुले आणि मुकुंद पारधी या नवनियुक्त शिक्षणसेवकांना सेवापुस्तकासंबंधी आवश्यक प्रशासकीय प्रक्रियेची सुरुवात करण्यास मदत होणार आहे. या डेलिगेशनमध्ये अखिल भारतीय शिक्षक संघाच्या राज्य संघटक नूतन बांगरे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केदारनाथ गोटेफोडे, राज्य प्रतिनिधी अनिरुद्ध मेश्राम व अय्यूब खान, जिल्हा कार्यकारिणीचे हेमंत पटले, विनोद लिचडे, सुनील सोनवाने, गणेश चुटे, लिकेश हिरापुरे, राजेंद्र निमबार्ते, सचिन धोपेकर व नरेंद्र घायवट उपस्थित होते.संघाचे अध्यक्ष मोरेश्वर बडवाईक, तालुका नेते योगानंद पटले, सरचिटणीस चंदु दुर्गे, देवेंद्र जतपेले, राजेश मोहनकर, मनिष राठोड, निरंजन सोनकल्याणी, विरेंद्र कावडे, डोमेन्द्र रहांगडाले, राजेश ब्राह्मण, कोटेश्वर कावडे, माधव हांडे, अरुण कटरे, नंदू चित्रीव, संतोष टेम्भरे, शैलेश गौतम, संतोष चित्रिव, तेजकुमार बिसेन, मनीष बलभद्रे, प्रकाश उरकुडे, विजय लिल्हारे, सतीश राऊत, विलास धकाते, प्रवीण राठोड, मुक्तानंद फड, टेकचंद चौधरी, हौसिंलाल रहांगडाले, हर्ष पवार, दत्तात्रय बागडे, ओमप्रकाश रहांगडाले, सुनील चौरगडे, रमेश सर्वे, एम. एन. उके, हिवराज वाघमारे, शिवशंकर डेकाटे, पितांबर फंडे, संतोष बिसेन, रामेश्वर नंदने, लालचंद भैसारे, राजेश पटले, देवेंद्र कोल्हे, महेंद्र कस्तुरे, राजू गोखे, माणिकलाल घाटघुमर, संजय भावे, गिरीश अग्रवाल, नुतेंद्र सुलाखे, अजय डोंगरे, नितेश जांभुडकर, कीर्तिमंत चांदेकर, राजेश गौतम, प्रदीप जाधव, अजय खांडेकर, सुरेश श्रीवास्तव, राजकुमार चंदेल, विजय वैद्य, सावलराम बिसेन, केशव मानकर, विनय बघेले, टेकेश्वर बिसेन, संदीप पिहरे, रामरतन रेला, सतीश नागपुरे, भूषण लोहारे, महेश कोरे, उमेश भगत, प्रमोद भांदकर, दिलीप हरिनखडे, बालमुकुंद फुले, तायमलाल मानकर, एम. ओ. रहांगडाले, चरण सूर्यवंशी, प्रेम नखाते, फिरोज पठाण, लीलाधर बनसोडे, संजय बिसेन व माधव रोडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष यशोदरा सोनवाने, कार्याध्यक्ष नितू डहाट, यशवंती लिखार, रेखा चौधरी, सरिता देवतारे, अनिता फॅब्यानी, स्फूर्ती बन्सोड, भारती पटले, तरन्नुम शेख, स्नेहल तारोने, सिंधू मोटघरे, योगिता पटले, उर्मिला गजभिये, रंजना बैस, धर्मशीला शरणागते, संगीता पंडित, वर्षा श्रीभद्रे, रोमा गोंडाने, कल्पना रहांगडाले, ज्योती फड, स्मिता मच्छीरके, पंचशीला जनबंधू, वैशाली पेटकर, योगिता बुरडकर, जयश्री तारोने, वर्षा बागडे, वैशाली मेश्राम, ललिता चौधरी, ललिता राऊत, गीता बोपचे, माया बोपचे, वैशाली लांबट, ममता टेम्भरे, मोना बडवाईक, चित्रारेखा ठाकरे, मनीषा ठाकरे, रोहिणी देशमुख, पूजा डोमाळे, पूनम पाटील, ईश्वरी परिहार, शशिकला डोंगरवार, प्रीती भालाधारे, परमेश्वरी पतेह, मनोरमा राऊत, नेहा गजभिये, रेखा रहांगडाले, लक्ष्मी तूरकर, लक्ष्मी सराटे, विनिता श्रीवास्तव, अफरोज खान व प्रभावती बैस यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघटना कटिबद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया यांच्या वतीने आयोजित या डेलिगेशनमध्ये शिक्षकांच्या सेवाविषयक, आर्थिक, प्रशासकीय आणि वैयक्तिक अडचणी मांडण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. काही कामांसाठी निश्चित तारखा व कालमर्यादा ठरविण्यात आल्या, तर जिल्हास्तरावरील विषयांबाबत पुढील पाठपुरावा करण्याचे ठरले. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने प्रयत्न करणे, नवनियुक्त शिक्षणसेवकांना प्रशासकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि शिक्षकांची प्रलंबित कामे मार्गी लावणे, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा गोंदिया सदैव प्रयत्नशील राहील, असा विश्वास संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

The Maharashtra State Primary Teachers’ Association, Gondia branch, met the block education officer to discuss pending service books, Shalarth IDs, school grants, salary-scale proposals and leave cases. The meeting outlined timelines for newly appointed education workers and promised follow-up on several administrative issues.

Read More
शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत हा अंतिम निर्णय नाही : खा. प्रफुल पटेल.

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत हा अंतिम निर्णय नाही : खा. प्रफुल पटेल.

वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत हा अंतिम निर्णय नाही : खा. प्रफुल पटेलविरोधकांनी सरकार पडण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आधी स्वतः एकत्र येऊन दाखवावे. गोंदिया : १६ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील आपल्या निवासी कार्यालयात उपस्थित असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक (उड्डाण) मंत्री प्रफुल पटेल यांनी पत्रकारांशी संवाद…

Read More
डव्वा निवासी शाळेत डुग्गीपार पोलिसांतर्फे विशेष कार्यशाळा.

डव्वा निवासी शाळेत डुग्गीपार पोलिसांतर्फे विशेष कार्यशाळा.

वार्ताहर : अजय शहारे | सडक/अर्जुनी डव्वा निवासी शाळेत डुग्गीपार पोलिसांतर्फे विशेष कार्यशाळा.सायबर सुरक्षा, महिला हक्क आणि स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन. सडक अर्जुनी : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, डव्वा येथे विद्यार्थिनींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सायबर गुन्हे, सायबर सुरक्षा तसेच महिला सुरक्षा या विषयांवर विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा…

Read More
शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ३० वर्षीय युवकाचा मृतदेह

शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ३० वर्षीय युवकाचा मृतदेह

वार्ताहर : अजय शहारे | अर्जूनी/मोर – सिरोली शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला ३० वर्षीय युवकाचा मृतदेहआत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, अर्जुनी मोरगाव पोलिसांत नोंद : गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील सिरोली शिवारात एका ३० वर्षीय युवकाने स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ता. 18 ऑक्टोबर च्या सायंकाळच्या सुमारास उघडकीस…

Read More
दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांबाबत प्रशासनाने खुलासा करावा.

दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांबाबत प्रशासनाने खुलासा करावा.

वार्ताहर : अजय शहारे | गोंदिया दुष्काळ जाहीर करण्याच्या निकषांबाबत प्रशासनाने खुलासा करावासप्टेंबर २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, सुरुवातीला गोंदिया जिल्ह्यातील केवळ तिरोडा तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झाला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील उर्वरित सात तालुक्यांचाही समावेश झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या पार्श्वभूमीवर धरणांमधील प्रत्यक्ष पाणीसाठा, तालुकानिहाय पर्जन्यमान, पीक नुकसानीची…

Read More
wartaa.in

गोदावरीतील अवैध वाळू उपशावर नांदेड पोलिसांचा मोठा प्रहार; ३.१५ कोटींचा मुद्देमाल उद्ध्वस्त

Nanded police launched a major crackdown on illegal sand mining in the Godavari River on October 16, 2026. Authorities reported action against boats, dredging equipment, rafts and sand worth an estimated Rs 3.15 crore, with cases being initiated at three police stations.

Read More
दीक्षाभूमी नागपूर येथे अंध व दिव्यांग कलाकारांच्या गायनाने वेधले उपस्थितांचे लक्ष!

दीक्षाभूमी नागपूर येथे अंध व दिव्यांग कलाकारांच्या गायनाने वेधले उपस्थितांचे लक्ष!

वार्ताहर : अजय शहारे | महाराष्ट्र दीक्षाभूमी नागपूर येथे अंध व दिव्यांग कलाकारांच्या गायनाने वेधले उपस्थितांचे लक्ष!नागपूर, दि. १६ ऑक्टोबर २०२६ :नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर दि. १६ ऑक्टोबर २०२६ रोजी अंध व दिव्यांग व्यक्तींनी आपल्या अप्रतिम गायनाची सुंदर झलक सादर केली. त्यांच्या मधुर आवाजाने आणि सुरेल सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.शारीरिक मर्यादांवर मात करत कलेच्या माध्यमातून…

Read More